सदस्य गेलेत फिरायला ! फोटो होताहेत व्हायरल; आरक्षणाचा सरपंच फितूर होण्याची धास्ती

Photos of Gram Panchayat election members going for a walk in Savleshwar are going viral
Photos of Gram Panchayat election members going for a walk in Savleshwar are going viral
Updated on

सावळेश्वर (सोलापूर) : ग्रामपंचायत सावळेश्वरची यावेळची निवडणूक रंगतदार ठरली आहे. यामध्ये वार्ड क्रमांक चारमध्ये एक सदस्य केवळ एकमताने निवडून आला तर दुसरा चिट्टीद्वारे गेल्याने यावेळी ब्रम्हनाथ ग्रामविकास आघाडीची सत्ता एक मताने म्हणजे ११ पैकी सहा सदस्यच मिळवण्यात यश आले.

गेल्या पंचवार्षिकमध्ये ११ पैकी १० सदस्य असलेल्या व आता फक्त सहा सदस्यावरच समाधान मानावे लागले. हे मिळालेले यश काठावर असल्यामुळे सहा सदस्य घेऊन परराज्यातील हैद्राबाद, विशाखापटणम, विजयवाडा, कन्याकुमारी आदी ठिकाणी सरपंच आरक्षण सोडत झाल्याच्या रात्रीपासून कुटुंबासह गाव सोडलेल्या सदस्यांना आता सरपंच निवडीच्या कार्यक्रमाचे वेध लागले आहेत. 

फिरायला गेलेल्या सदस्यापैकी एखादा सदस्य आपल्याकडे येऊ शकतो का ? यासह अन्य बाबींचा अंदाज विरोधी गट घेत आहे. त्यामुळे सहा जागा निवडून आल्यानंतरही चिंतेत असलेल्या पॅनलप्रमुखाला सरपंच निवड होईपर्यंत चिंता लागून राहिली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत सत्ताधारी गटात जावई, तर विरोधी गटात सासुबाई उभ्या होत्या. त्यांचा केवळ एका मताने पराभव झाला व जावई ही पराभूत झाले आहेत. वॉर्ड क्रमांक १ मधून दोन अविवाहित पुरुष निवडून आले, तर वॉर्ड क्रमांक तीनमधून एक अविवाहित महिला निवडून आली आहे. एकंदरीत मतदारांनी तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे .

ठळक बाबी

मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडी (ता. ०९) फेब्रुवारी व (ता. ११) फेब्रुवारीला होणार. 
कर्मचारी कमी असल्याने पहिल्यांदाच सरपंच निवडीसाठी इतर विभागातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.