esakal | Solapur : धार्मिक स्थळे उघडण्यासाठी नियोजन सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur : धार्मिक स्थळे उघडण्यासाठी नियोजन सुरू

Solapur : धार्मिक स्थळे उघडण्यासाठी नियोजन सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : राज्य शासनाच्या आदेशानुसार ७ ऑक्‍टोंबरपासून महाराष्ट्रातील सर्व प्रार्थना स्थळे खुली होणार आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रार्थना स्थळे सुरु करण्यासाठी व कोरोना नियमांचे पालन करुन नियमावली ठरविण्यासाठी महापालिका प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन कामाला लागले आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज नियोजन भवनात अक्कलकोट व पंढरपूर येथील मंदिरांबाबतचा आढावा घेतला. महापालिकेने मंदिर समिती पदाधिकाऱ्यांची बैठकी सोमवारी (ता. ४) सकाळी ११. ३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात बैठक बोलविली आहे.

महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त विजय खोराटे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून मंदिर बंद होती. शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत धार्मिक स्थळे ७ ऑक्‍टोबरपासून भाविकांसाठी खुले करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका परिक्षेत्रातील धार्मिक ठिकाण, प्रार्थना स्थळे खुले करण्यासाठी मंदिर समिती पदाधिकारी यांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये धार्मिक ठिकाण परिसर, भाविकांची संख्या, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर माहिती, नियमावली आदी सर्व बाबींची चर्चा करून मंदिर उघडण्याबाबतच्या रूपरेषा स्पष्ट करण्यात येणार असल्याचेही अतिरिक्‍त आयुक्‍त खोराटे यांनी सांगितले.

पंढरपूर व अक्कलकोट ही दोन महत्वाचे धार्मिक स्थळे आपल्याकडे आहेत. त्याबाबतचा प्राथमिक आढावा आज घेण्यात आला आहे. शिर्डी आणि तुळजापूरबाबत तेथील प्रशासन काय निर्णय घेतात हे देखील आम्ही पाहत आहोत. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये याबाबतचा स्पष्ट आदेश काढला जाईल.

- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी

loading image
go to top