esakal | माढ्यात महिला दिनी घरावर लागणार ‘ती’च्या नावाचे फलक
sakal

बोलून बातमी शोधा

Plaque for womens name on womens day home in Madha

अॅड. साठे म्हणाल्या, मंडळाच्या महिला सध्या घरोघरी जाऊन कुटुंब प्रमुखांना कुटुंबातील महिलांचे स्थान महत्त्वाचे असल्याचे पटवून सांगत आहेत. तसेच कुटुंबात असलेल्या महिला सदस्यांची किंवा कुटुंबप्रमुख महिलेची नेम प्लेट घरासमोरील दर्शनी भागावर लावण्यासाठी सांगत आहेत.

माढ्यात महिला दिनी घरावर लागणार ‘ती’च्या नावाचे फलक

sakal_logo
By
किरण चव्हाण

माढा (सोलापूर) : महिला दिनानिमित्त येथील प्रियदर्शनी महिला विकास मंडळ एक हजारहून अधिक घरांना महिलांच्या नेम्प्लेट लावणार आहे, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा तथा नगराध्यक्षा ॲड. मीनल साठे यांनी दिली.
अॅड. साठे म्हणाल्या, मंडळाच्या महिला सध्या घरोघरी जाऊन कुटुंब प्रमुखांना कुटुंबातील महिलांचे स्थान महत्त्वाचे असल्याचे पटवून सांगत आहेत. तसेच कुटुंबात असलेल्या महिला सदस्यांची किंवा कुटुंबप्रमुख महिलेची नेम प्लेट घरासमोरील दर्शनी भागावर लावण्यासाठी सांगत आहेत. या माध्यमातून सध्या एक हजार घरांसाठीच्या नेमप्लेट तयार करण्यात आल्या आहेत. आणखीनही अनेक कुटुंबे यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील महिलांचे स्थानही महत्त्वपूर्ण असल्याचं यामधून अधोरेखित करण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय ८ मार्चला दुपारी ४ वाजता माढा नगरपंचायतीच्या सहकारमहर्षी ( कै. ) गणपतराव साठे सभागृहापासून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रियदर्शनी महिला मंडळ माढा शहरांमधून
महिलांची रॅली काढणार असून या रॅलीत महिलांचे झांज पथक व महिलांचे पथक ढोल पथक असणार आहे. महिलांची स्कूटी रॅलीही यात सहभागी होणार आहे. रॅलीत पारंपारिक वेशभूषा, सणांचे सादरीकरण व‌ सामाजिक संदेश देण्यात येणार आहेत. महिलांसाठी आरोग्यशिबीर, हिमोग्लोबिन, कॅन्सर तपासणी, आदर्श माता पुरस्कार, शौर्य पुरस्कार, फुड फेस्टिव्हल, उन्हाळी काम, चंदाताई तिवाडी यांचे भारूड असे विविध कार्यक्रम महिला दिनानिमित्ताने मार्च महिन्यात घेण्यात येणार असून यामध्ये माढा तालुक्यातील महिलांनी सहभागी होण्याचे आव्हान अॅड. साठे यांनी केले आहे.

loading image