जगणचं बस बस झालंय... हे दिस कधी संपतील...?

The plight of working women in Solapur
The plight of working women in Solapur
Updated on

सोलापूर : तो व्हायरस लांबून आलाय अन्‌ आमचं जगणं आवघड करून ठेवलय... मार्चपासून पोटा- पाण्याची लई सुरु आहे. दोन महिन्यांपासून तो आल्यामुळे जगणचं बस बस झालंय... काय खावं? अन् लेकरांना घेऊन कसं जगावं? देवा आमचं हे दिस कधी संपतील...? अशी व्यथा आहे घरकाम करणाऱ्या महिलांची.
घरकाम करणाऱ्या बहुतांश महिलांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. दुसऱ्यांच्या घरात घरकाम करणाऱ्या महिला आजवर उपेक्षित राहिल्या आहेत. त्यात कोरोना व्हायरसमुळे त्यांच्या कामावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे आपले घर कसे चालणार... आपला उदरनिर्वाह कसा होणार... असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.

घरकाम करणाऱ्या महिला त्यांना कोणत्याही सोयी- सुविधा मिळत नाहीत. त्यातच काही महिला लांबून जेवण बनवण्यासाठी किंवा घर कामासाठी जात असतात. या महिला वेगवेगळ्या भागात फिरून येत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही नागरिकांनी त्यांच्या सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती काम करणाऱ्या महिलांच्या अडचणी वैयक्तिक आणि घरगुती असल्या तरी कोणीही ऐकून घेत नाही. यावर मार्गदर्शन होत नाही. काही घरगुती काम करणाऱ्या महिलांना कामासाठी बोलवण्यात आले होते. परंतु सोलापूर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिलांना कामावरून काढले आहे.‌ हातावर पोट असलेल्या महिलांना घरगुती अडचणी, आर्थिक स्थिती चांगली नसल्याने अनेक महिला हतबल झाले आहेत. कोरोना व्हायरसमुळेच घरकाम करणाऱ्या महिलांना घरीच बसावे लागत आहेत. त्यामुळे काही नागरिकांनी घरकाम करणाऱ्या महिलांना घरीच बसण्यास सांगितले. अशावेळी नेमके काय करायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. या कोरोना व्हायरसमुळे अनेक घरकाम करणाऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने महिलांनी आम्ही कसे जगणार आणि आमच्या लेकरांना कसे जगवणार अशी व्यथा मांडली आहे.

सुट्टी घेण्यास सांगितले
श्‍वेता पाटील म्हणाल्या, दोन महिन्यांपासून कोरोना व्हायरसमुळे आमच्या कामावर त्याचा परिणाम झाला आहे. पोटापाण्याचा प्रश्न आम्हाला सतावत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी स्वयंपाक करण्यासाठी जातो त्या ठिकाणी आम्हाला काही दिवस सुट्टी घेण्यासाठी सांगितले आहे. त्यामुळे आता काय खायचं अन् कसं जगायचं ही चिंता आम्हाला सतावत आहे.

३५ वर्षापासून हेच काम
भागुबाई कोरे म्हणाल्या, ३५ वर्षापासून घरगुती काम करण्यासाठी जाते. आता सध्या कोरोनाव्हायरस सुरू आहे, तरी कामाला सुट्टी न देता तरी आम्हाला कामावर येण्यास सांगितले होते. परंतु शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सध्या सुरू असलेले काम बंद पडले आहे.‌ कोरोनामुळे हाताचे ‌काम सुटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com