Solapur News : मोदी आवास मध्ये केंद्राच्या निकषाप्रमाणे समाविष्ट जातीचा समावेश करावा - खांडेकर

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना जवळपास 14 हजार लाभार्थी घरकुलासाठी निश्चित
pm modi awas gharkul yojana obc category beneficiary get pradeep khandekar solapur politics
pm modi awas gharkul yojana obc category beneficiary get pradeep khandekar solapur politicsSakal
Updated on

मंगळवेढा : मोदी आवास घरकुल योजनेमध्ये ओबीसी प्रवर्गाच्या लाभार्थ्यांमध्ये केंद्राच्या जातीचा यादीचा निकष लावून धनगर, हटकर, वडर ,कैकाडी या जातीमधील लाभार्थ्यांना मोदी आवास मधून लाभ द्यावा अशी मागणी जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर यांनी केली.

यासंदर्भातील मागणी आ.समाधान आवताडे यांच्याकडे देखील केली. प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना जवळपास 14 हजार लाभार्थी घरकुलासाठी निश्चित केले.या लाभार्थ्यामधील फक्त ओबीसी प्रवर्गातील लाभार्थी मोदी आवास घरकुल येण्यासाठी पात्र ठरविण्यात आल्यामुळे त्यांना लवकर घरकुलाचा लाभ मिळणार आहे.

pm modi awas gharkul yojana obc category beneficiary get pradeep khandekar solapur politics
Solapur News : दुष्काळाच्या सवलती ज्या 40 तालुक्याला दिल्या त्याच सवलती मोहोळ मतदार संघातील शेतकऱ्यांना द्या; यशवंत माने

अशात जिल्ह्यात जवळपास 62 हजार घरकुलाचा लाभ तीन वर्षात दिला जाणार आहे.परंतु यासाठी समाविष्ट जातीचा निकष ठरवताना केंद्राच्या निकषांमध्ये धनगर, हटकर, कैकाडी, वडार, या जाती तील लाभार्थी ओबीसी प्रवर्गात निश्चित केले.

परंतु मोदी आवास मध्ये फक्त राज्यातील जातीचा निकष लावल्याने या जातीचे लाभार्थी घरकुल लाभापासून वंचित वंचित राहणार आहेत. सध्या या प्रवर्गातील या जातीचा समावेश केल्यास तालुक्यातील निम्म्याहून अधिक बेघरांना याचा लाभ होणार आहे.

त्या दृष्टीने प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ही केंद्र सरकारची असल्याने यासाठी निवडलेल्या केंद्राच्या निकषाप्रमाणे निवडलेले आहेत त्यामुळे राज्याने त्यांचा स्वतंत्र निकष न लावता केंद्रीय निकषाच्या आधार घेऊन जास्तीत जास्त बेघरांना घरकुलाचा लाभ देण्याच्या दृष्टीने या जातीचा समावेश करून त्यांना घरकुलाचा लाभ द्यावा अशी मागणी नियोजन मंडळ सदस्य खांडेकर यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com