
‘चाप्टर’च्या हजेरी प्रमाणपत्रासाठी पोलिसाचा चॅप्टरपणा! लाचलुचपतने ५०० घेताना पकडले
सोलापूर : सहायक पोलिस आयुक्तांनी एका गुन्ह्यात संशयित आरोपीला पोलिस ठाण्याची हजेरी लावली होती. त्याची हजेरी मंगळवारी (ता. १०) संपणार होती. त्यामुळे त्याचे प्रमाणपत्र संशयित आरोपीला लागणार होते. ते प्रमाणपत्र देताना पाचशे रुपये द्यावे लागतील अशी मागणी पोलिस कर्मचारी नाना शिंदे याने तक्रादाराकडे केली होती. सोमवारी ही रक्कम देण्याचे ठरले आणि मंगळवारी ही रक्कम घेताना शिंदे याला सदर बझार पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाइ लाचलुचपतचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक उमेश महाडीक यांच्या पथकाने नुकतीच केली. पोलिस कर्मचारी नाना शिंदेविरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
ठळक बाबी...
- चॅप्टर केसमधील हजेरी प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले पाचशे रुपये
- सोमवारी (ता. ९) भेटायला बोलावले आणि आज पाचशे रुपये घेऊन येण्यास सांगितले
- हजेरीची स्वाक्षरी करून पाचशे रुपये वहित ठेवायला सांगितले
- ३६ वर्षीय सदर बझार पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी नाना शिंदे लाचलुचपतच्या जाळ्यात
Web Title: Police Chapters For Attendance Certificate Of Chapter Caught Taking Bribe
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..