भोयरे येथे पोलिसांची अवैध वाळू उपशावर कारवाई ! 10.87 लाखांचा मुद्देमाल जप्त 

Sand
Sand

नरखेड (सोलापूर) : भोयरे (ता. मोहोळ) येथील सीना नदीकाठी अवैध वाळू उपशावर पोलिसांनी कारवाई करत एकूण दहा लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेची फिर्याद कॉन्स्टेबल सत्यवान जाधव यांनी मोहोळ पोलिसात दिली आहे. 

मोहोळ पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की मोहोळ तालुक्‍यातील भोयरे येथे सीना नदीकाठी दररोज रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याची बातमी मोहोळ पोलिसांना त्यांच्या बातमीदाराकडून समजली. त्यानुसार रविवारी (ता. 14) दुपारी सीना नदीकाठी पोलिस निरीक्षक अशोक सायकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल गणेश पोपळे, पोलिस नाईक शरद ढावरे व पोलिस कॉन्स्टेबल सत्यवान जाधव यांनी पाहणी केली असता सीना नदीकाठी वाळूचा मोठ्या प्रमाणात साठा केलेले दोन मोठे ढिगारे व वाळूचा उपसा करण्याचे साहित्य आढळून आले. या वाळूचा पंचनामा केला असता संपूर्ण मुद्देमालाची किंमत दहा लाख 87 हजार रुपये होत असल्याची पंचनाम्यात नोंद करण्यात आली आहे. 

पोलिसांच्या बातमीदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार हा वाळूचा उपसा रात्रीच्या वेळी करून त्याचा साठा केला जात होता. तसेच अवैधरीत्या चोरटी वाळू वाहतूक केली जात असल्याचे सांगितले. ही वाळू समाधान खंदारे, दीपक शेंडगे, सागर पवार, तुकाराम खंदारे, किरण गायकवाड, सिंधू खरात, हमू शिरसट, प्रवीण ऊर्फ पांडुरंग गायकवाड आदी करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा अधिक तपास गणेश श्री. पोपळे हे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com