Solapur: बँकेतील रकमेचा डॉ. शिरीष वळसंगकर जीवन संपवण्याचा संबंध नसल्याचा युक्तिवाद; मनीषा यांना पोलिस कोठडी..
अर्जास अडचण यावी म्हणून पोलिसांनी नवा मुद्दा उपस्थित केल्याचेही ॲड. नवगिरे म्हणाले. परंतु, गुन्हा हाय प्रोफाइल असल्याने न्यायालयाने मनीषा यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली.
Manisha taken into police custody as court hears arguments in Dr. Valsangkar suicide caseSakal
सोलापूर : न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मनीषा माने मुसळे यांच्या खात्यातील रकमेची सखोल चौकशी करायची असल्याचे सांगत पोलिसांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी मागितली. त्यावर न्यायालयाने मनीषा यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.