मरवडे विषबाधा प्रकरण : दोन आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी

दोन मुलींचा झाला होता मृत्यू, आरोपींना नाशिक जिल्ह्यातून अटक
Police-Custody
Police-CustodySakal
Updated on: 

मंगळवेढा (सोलापूर) : दुग्धजन्य पदार्थांतून झालेल्या विषबाधेतून मरवडे (ता. मंगळवेढा) येथील दोन मुलीच्या मृत्यू (Death) प्रकरणातील संशयित आरोपी डेअरी चालक संतोष कौडूभैरी व आकाश फुगारे यांना पोलिसांनी अटक (Arrest) केली असून त्यांना आज येथील न्यायाधीश आर. व्ही. नडदगल्ली यांच्यासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. (Solapur Crime News)

आबासाहेब चव्हाण (रा. मरवडे) यांनी आपल्या मुलींना खाऊ म्हणून मंगळवेढ्यातील समर्थ डेअरीमधून पनीर, श्रीखंड, बासुंदी असे दुग्धजन्य पदार्थ घरी आणले होते. त्या पदार्थातून विषबाधा होऊन त्याच्या दोन लहान मुलींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी अन्नभेसळ खात्याच्या अधिकाऱ्यांनी संतोष कौडूभैरी व आकाश फुगारे या दोघांवर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ते फरार झाले.

Police-Custody
टीईटी परिक्षेसाठी परीक्षार्थींकडून चार कोटी रुपये घेणारे दोघे अटकेत

आरोपीच्या अटकेसाठी मरवडे ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करून पोलिस निरीक्षकांनी या प्रकरणात हयगय केल्याचा आरोप केला होता. उपस्थित जमावाला उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांनी शांत करत आरोपींना अटक करणार असल्याचे सांगत दोन पथकाची नियुक्ती केली. दरम्यान, या दोघांना आज नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्‍यातील मुसळगाव येथे पहाटे ताब्यात घेतल्याचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी सांगितले. आज सायंकाळी त्यांना न्यायालयात हजर केले.

पोलिसांनी दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठीचा माल कुठून आणला यातील आणखी तपास कामासाठी सात दिवसाची पोलिस कोठडी मागणी केली. तर आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना ऍड. धनंजय हजारे यांनी फिर्याद नमुद केलेल्या तारखेप्रमाणे फिर्यादी दुकानात खरेदीसाठी आलाच नव्हता. त्याबाबत सीसीटीव्ही फुटेज सादर करावे, असा युक्तिवाद न्यायालयासमोर केला दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायालयाने संशयित आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Auto Rickshaw and Pratap Sarnaik
Solapur Water Supply Scheme Gets Approval for 1350 Crore Project to Ensure Daily Water Supply Across the City
Pandharpur Corridor News Affected Residents Protest Land Acquisition Notices and Demand Protection of Their Properties
Assembly Session Police Alert Strict Orders to Police Inspectors Against Illegal Businesses and Traffic Violations in the City