सोलापुरात उद्या मराठा आक्रोश मोर्चा ! सांगली, दौंडवरून मागवला पोलिस बंदोबस्त

सोलापुरात उद्या मराठा आक्रोश मोर्चा ! सांगली, कोल्हापूर, दौंडवरून मागवला पोलिस बंदोबस्त
Maratha Morcha
Maratha MorchaCanva

काही झाले तरी मोर्चा होणारच, अशी भूमिका नरेंद्र पाटील यांनी घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण व शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्याचे नियोजन केले जात आहे.

सोलापूर : मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांचे आरक्षण (Maratha Reservation)) रद्द झाल्याने विद्यार्थ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर माजी आमदार नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी रविवारी (ता. 4) मराठा आक्रोश मोर्चाची (Maratha Akrosh Morcha) हाक दिली आहे. मात्र, पोलिस आयुक्‍तांनी कोरोना (Covid-19) व डेल्टा प्लस (Delta Plus) मुळे मोर्चाला परवानगी नाकारली आहे. मात्र, काही झाले तरी मोर्चा होणारच, अशी भूमिका नरेंद्र पाटील यांनी घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण व शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त (Police Force) लावण्याचे नियोजन केले जात आहे. ग्रामीण भागात तालुक्‍यातून शहराकडे येणाऱ्या मार्गांवर तर शहरात येणाऱ्या प्रत्येक पॉईंटवर पोलिसांचा फौजफाटा असेल, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. (Police force from Sangli, Kolhapur and Daund for the Maratha Morcha in Solapur)

Maratha Morcha
कोरोनामुक्त गावांमध्ये ऑफलाइन शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव !

कोरोनाच्या काळात मोठ्या संख्येने मराठा आक्रोश मोर्चा निघणार नाही, याची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. परवानगी नसतानाही हा मोर्चा काढला जाणार असल्याने राज्य राखीव पोलिस दल, होमगार्ड, स्थानिक पोलिस आणि कोल्हापूर, सांगली आणि दौंड येथून पोलिसांचा बंदोबस्त मागविण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे (Commissioner of Police Ankush Shinde) यांनी दिली. दरम्यान, मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर बाहेरून येणारा बंदोबस्त सोलापुरात दाखल झाला असून शहरात येणाऱ्या प्रत्येक पॉईंटवर हा बंदोबस्त लावला जाणार आहे. त्या ठिकाणी बॅरिकेडिंग लावून शहरात येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी केली जाईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Maratha Morcha
दणक्‍यात साजरा झाला बार्शीत 8000 झाडांचा "हॅप्पी बड्डे'!

ग्रामीणमधील पोलिस बंदोबस्त...

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मोर्चा काढू नये, असे आवाहन करीत पोलिस आयुक्‍तांनी मराठा आक्रोश मोर्चाला परवानगी नाकारली आहे. तरीही, संयोजकांनी हा मोर्चा होणारच, अशी भूमिका घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर सांगली, कोल्हापूर, दौंड व स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. ग्रामीण भागातून आंदोलक सोलापुरात येणार नाहीत, याची खबरदारी घेत ग्रामीण भागात जवळपास दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवला जाणार आहे. तालुक्‍यातून सोलापूर शहराकडे येणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांचा मोठा फौजफाटा असणार आहे. दौंडवरून राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या (200 पोलिस) मागविण्यात आल्या असून सांगली व कोल्हापुरातून दोनशे पोलिस कर्मचारी बोलावण्यात आले आहेत. तसेच एक हजारांपर्यंत होमगार्ड तर स्थानिक पोलिसांचा जवळपास सहाशे जणांचा बंदोबस्त त्या ठिकाणी असेल, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com