
मोहोळ : जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री नेरपगार व त्या त्या विभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखा सोलापूर, प्रादेशिक परिवहन विभाग व महामार्ग पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या पंढरपूरच्या वारीच्या पार्श्वभूमीवर "अपघात मुक्त वारी अभियान" हा उपक्रम सुरू केला असून, त्याचा आरंभ मोहोळ येथून सोमवार (ता. 23) पासून करण्यात आला.