Mohol News : शिंगोलीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल जगदीश कस्तुरे यांना 'उत्कृष्ट सेवा पदक' जाहीर मोहोळ तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

हेड कॉन्स्टेबल जगदीश विठ्ठल कस्तुरे यांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र शासनाचे व पोलीस दलातील मानाचे ‘उत्कृष्ट सेवा पदक’ झाले जाहीर.
Police Head Constable Jagdish Kasture

Police Head Constable Jagdish Kasture

sakal

Updated on

मोहोळ - शिंगोली, ता. मोहोळ येथील रहिवासी तथा पुणे शहर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल जगदीश विठ्ठल कस्तुरे यांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र शासनाचे व पोलीस दलातील मानाचे ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे. त्यांच्या दीर्घकालीन, व उल्लेखनीय सेवेची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. या निमीत्ताने मोहोळ तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com