रस्त्यावर येणारी सर्व वाहने होत आहेत जप्त!

vahan japt
vahan japt
Updated on

सोलापूर : संचारबंदीच्या कालावधीत घराबाहेर पडणाऱ्या लोकांची दुचाकी, चारचाकी वाहने जप्त करण्याच्या कारवाईला आज रविवारी सकाळपासून झाली आहे. दोन तासात शेकडो वाहने जप्त करण्यात आली आहेत.

शहरातील सर्वच प्रमुख चौकात, रस्त्यांवर नाकाबंदी करून वाहने अडविण्यात येत आहेत. सर्व वाहने जप्त करण्यात येत असून ती लॉकडाऊन नंतरच सोडण्याचा पोलिसांचा विचार आहे. सैफुल, विजापूर नाका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, एमआयडीसी, कुमठा नाका, आसरा चौक, सात रस्ता, रेल्वे स्टेशन परिसर, रूपा भवानी रोड या परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. सकाळपासून शेकडो वाहने पोलिसांनी जप्त केली असून ती लॉकडाऊन नंतर परत करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ganja Seized
Pandharpur VIP Darshan ban during Ashadhi Wari
mantralay
Punyashlok Ahilyadevi Holakar univercity, solapur
Marathi News Esakal
www.esakal.com