बारा हजारांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक सापळ्यात

वाहनांवर कारवाई न करण्यासाठी ठरविला मासिक ‘हप्ता’
police
policesakal news
Updated on

सोलापूर - रेल्वे स्टेशन परिसरात खासगी प्रवासी वाहतूक करताना तक्रारदाराच्या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी रेल्वे स्टेशन पोलिस चौकीतील पोलिस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर (वय ३४) याने त्यांना मासिक हप्ता म्हणून १३ हजारांची मागणी केली. तडजोडीअंति १२ हजार रुपये देण्याचे ठरले आणि पोलिस चौकीतच लाचेची रक्कम स्वीकारताना क्षीरसागर यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

घटनेची हकीकत अशी, सदर बझार पोलिस ठाण्याअंतर्गत रेल्वे स्टेशन पोलिस चौकीचा कारभार पोलिस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर यांच्याकडे होता. रेल्वेतून उतरल्यानंतर अनेक प्रवासी खासगी वाहनांनी घरी जातात. त्या ठिकाणी खासगी वाहनांची मोठी गर्दी असते. अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर तथा वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाते. ही कारवाई टाळण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक क्षीरसागर यांनी तक्रारदाराकडे दरमहा १३ हजार रुपयांचा हप्ता देण्याची मागणी केली.

तक्रारदार, त्याचा भाऊ व त्याच्या दोन मित्रांची खासगी वाहने आहेत. त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून तडजोड करून १२ हजार रुपये दरमहा देण्याचे निश्चित झाले. पहिलाच हप्ता घेताना पोलिस उपनिरीक्षक क्षीरसागर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, उद्या (शनिवारी) त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती लाचलुचपतचे उपअधीक्षक संजीव पाटील यांनी दिली.

‘या’ पथकाने केली कारवाई

पोलिस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज पोलिस चौकीतच लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलिस अंमलदार शिरीषकुमार सोनवणे, पोलिस नाईक श्रीराम घुगे, अतुल घाडगे, प्रमोद पकाले, उमेश पवार, श्‍याम सुरवसे यांच्या पथकाने केली. मागील चार महिन्यांत सदर बझार पोलिस ठाण्याअंतर्गत ही दुसरी कारवाई आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur Municipal Schools Face Sale Proposal as Civic Body Seeks Funds for Major Water Supply Project
solapur city DJ Noise Case
government scheme
Voter List Updation
Marathi News Esakal
www.esakal.com