Crime News : तीन वेळा सिमकार्ड बदलूनही 9 महिन्यानंतर पोलिसाच्या कचाट्यात Police succeeded arresting accused case abducting 17-year minor girl by luring her into marriage Karnataka | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police succeeded arresting accused case

Crime News : तीन वेळा सिमकार्ड बदलूनही 9 महिन्यानंतर पोलिसाच्या कचाट्यात!

मंगळवेढा : 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याप्रकरणातील आरोपी अमोल एकनाथ सुर्यवंशी याला तब्बल 9 महिन्यानंतर कर्नाटक राज्यातून पकडण्यात पोलीसांना यश आले आहे.आरोपीने तीन वेळा सिमकार्ड बदलूनही पोलीसाच्या कचाट्यात सापडला.

या घटनेची हकीकत अशी, आरोपी अमोल सुर्यवंशी याने दि.2 जून 2022 रोजी रात्री 8 वाजता पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिला लग्नाचे अमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. याची तक्रार पिडीत मुलीच्या वडिलाने पोलीसात दिली होती.आरोपीने मोबाईल बंद ठेवल्यामुळे तपासात सुधारणा होत नसल्याने हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसो पिंगळे यांच्याकडे देण्यात आला.

आरोपीचा मोबाईल बंद असल्यामुळे आरोपी शोधणे मुश्किल असतानाही वेगळ्या पध्दतीने तपास सुरु केला. या दरम्यान आरोपीच्या मित्राचा नंबर सातत्याने कॉलींग केल्याचा मिळून आला. आरोपी मुलीसह कर्नाटक राज्यामध्ये त्याच्या मित्राच्या घरी रहावयास होता. दरम्यान आरोपीने मित्राच्या नावावर दोन सीम घेवून ते डिसेंबर पर्यंत वापरले.

पुन्हा घर मालकाच्या नावावर सीम कार्ड काढून घेतले. प्रत्येक तीन महिन्याला आरोपी हा सातत्याने नंबर बदलून पोलीसांना हुलकावणी देत होता. शेवटी मित्राच्या नंबरचा सीडीआर काढला या मध्ये जवळपास 15 लोकांचे सीडीआर चेक केल्यानंतर कुठेतरी तपासाला दिशा मिळाली अन् तपासिक अंमलदार स.पो.नि. पिंगळे व पोलीस शिपाई वैभव घायाळ यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथे आरोपी वावरत असल्याचा सुगावा लागला.

आरोपी हा एका वाहनावर चालक असल्याची माहिती मिळाली पोलीस अधिकार्‍यांनी सातारा जिल्ह्यातील लोणंद घाटात गस्त लावली असता आरोपी चालक हा सुर्योदयापुर्वी दरम्यान वाहन उभे करुन शौचालयास गेल्याने तो अलगद पोलीसाच्या जाळ्यात सापडला.

पोलीसांनी आरोपीस ताब्यात घेवून मुलीची विचारपूस केली असता ती कर्नाटकात असल्याचे चौकशी दरम्यान सांगीतले. पोलीसांनी तेथे जावून मुलीस व आरोपीस ताब्यात घेतले.तर मुलीला सोलापूर येथील बालसुधारगृहात पाठविण्यात आल्याचे सांगीतले.