
सोलापूर : पतंग उडविण्यासाठी अनेकजण नायलॉन मांजा वापरतात. तो दोरा नायलॉन, प्लास्टिक किंवा सिंथेटिक साहित्यापासून तयार केला जातो. पक्ष्यांसह मानवी जिवाला त्यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यभरात अशा घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी सोलापूर शहरासाठी स्वतंत्र आदेश काढले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ नुसार सहा महिन्यांचा कारावास होऊ शकतो, असा इशाराही आदेशातून देण्यात आला आहे.