सोलापूर - ‘महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी अधिक सतर्क राहावे. ‘भरोसा सेल’मध्ये नोंद होणाऱ्या प्रकरणांवर तातडीने कारवाई करत गुन्हे निकाली काढावेत. महिलांच्या सुरक्षेसाठी कौटुंबिक संरक्षण कायद्यांतर्गत ठोस उपाययोजना राबवाव्यात,’ अशा स्पष्ट सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सोलापूर येथे दिल्या.