Solapur Politics: आगामी लोकसभा निवडणूक महत्त्वाची असल्याने खासदारकीला हातात हात, आमदारकीला पायात पाय

मोहोळ, माढा, माळशिरस आणि करमाळा या मतदार संघातील एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक सत्तेच्या सावलीत गुण्यागोविंदाने सध्या तरी व्यवस्थित नांदताना दिसत आहेत
Politics
PoliticsEsakal

शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर सध्या काय वाटत असेल, ईडी आणि आयटीचा दूत म्हणून परिचित असलेले माजी खासदार किरीट सोमय्या यांना सध्या काय वाटत असेल?, राष्ट्रवादी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांना राज्यस्तरीय नेत्यांना सध्या काय वाटत असेल, हा जसा प्रश्‍न उत्सुकता निर्माण करतो, तसाच प्रश्‍न जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात निर्माण झाला आहे. (Latest Marathi News)

मोहोळ, माढा, माळशिरस आणि करमाळा या मतदार संघातील एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक सत्तेच्या सावलीत गुण्यागोविंदाने सध्या तरी व्यवस्थित नांदताना दिसत आहेत. या नेत्यांमधील आजपर्यंतची दुश्मनी संपली की त्यांना सत्तेचा गोडवा सारं काही सहन करण्यास भाग पाडू लागला आहे, याचे कोडे सामान्यांना पडले आहे. भाजपसाठी २०२४ ची लोकसभा निवडणूक महत्त्वाची असल्याने तूर्तास खासदारकीला हातात हात आणि आमदारकीला पायात पाय, अशीच रणनीती दिसत आहे.

- प्रमोद बोडके

सात मतदार संघाचे चित्र स्पष्ट

जिल्ह्यातील ११ पैकी चार (मोहोळ, माढा, माळशिरस व करमाळा) विधानसभा मतदार संघात राजकीय गोंधळ दिसत असला तरीही उर्वरित सात (बार्शी, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, सांगोला, पंढरपूर-मंगळवेढा) मतदार संघातील राजकीय चित्र सध्या तरी स्पष्ट दिसत आहे. खासदारकीच्या गणितात आमदारकीचे गणित नसल्याने ‘आपल्या वेळेस बघू’ असाच सल्ला सध्या नेत्यांकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांना दिला जात आहे.(Latest Marathi News)

Politics
NCP News: शरद पवार की अजितदादा? राष्ट्रवादीत भावनिक घालमेल! श्रद्धास्थान एकच, मग निष्ठास्थान कसे ठरवणार?

मोहोळ

माजी आमदार राजन पाटील यांचे राजकीय विरोधक म्हणून परिचित असलेले खासदार धनंजय महाडिक, संजय क्षीरसागर, माजी सभापती विजयराज डोंगरे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील सर्वच शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या निमित्ताने आता सत्तेचे सोबती झाले आहेत. त्यामुळे मोहोळ मतदार संघातील राजकीय गणित पुरते बिघडले आहे. आपला गट आपण शाबूत ठेवायचा, राज्यातील सत्तेचा लाभ घ्यायचा असेच धोरण बहुतांश मंडळींचे ठरलेले दिसत आहे. सत्तेत सर्वच सोबती झाल्याने कधी नव्हे ती मोहोळच्या राजकारणात पहिल्यांदा माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधकांनाही सत्तेची ताकद मिळू लागली आहे. त्यामुळे २०२४ मध्ये आमदारकीचा तगडा सामना होण्याची शक्यता आहे.

Politics
Nana Patole News : राहुल गांधींवरील फ्लाइंग किसचा आरोप हा..... नाना पटोलेंची भाजपावर टीका

माढा

विरोधकांच्या मतांमध्ये फूट पडल्यानेच बबनराव शिंदे आमदार होतात, असाच आरोप २०१९ पर्यंत होत होता. वाकावच्या सावंत बंधूंनी दोन पावले माघार घेत एकास एक उमेदवार म्हणून संजय कोकाटे यांना संधी दिली. २०१९ मध्ये एकास एक लढत होऊन देखील बबनराव शिंदे यांनी सहाव्यांदा माढ्यातून तब्बल ६८ हजारांनी आमदारकी मिळवली. राज्यातील समीकरणामुळे आता आमदार शिंदे, शिवसेनेचे प्रा. शिवाजी सावंत व संजय कोकटे हे तिघेही सत्तेची सोबती झाले आहेत. राज्यातील सत्तेचा फायदा घेऊन परिवर्तन होते का? याचा अंदाज घेण्यासाठी सावंत-कोकाटे यांनी कुर्डुवाडी बाजार समितीच्या माध्यमातून चाचपणी केली. परंतु नेहमीप्रमाणे ‘एकच वादा, पुन्हा बबनदादा’ उत्तर आल्याने माढ्यातील २०२४ च्या नव्या फॉर्म्युल्याकडे लक्ष लागले आहे.(Latest Marathi News)

Politics
Eknath Khadse News : शिवसेनेने नव्हे, 2014 मध्ये भाजपने.... नरेंद्र मोदींच्या वक्तव्याला एकनाथ खडसेंचे उत्तर

करमाळा

२०१४ आणि २०१९ मध्ये एकमेकांची आमदारकी हुकविण्यात आमदार संजय शिंदे, माजी आमदार नारायण पाटील व रश्‍मी बागल यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. करमाळ्यातील दोघांत माढ्याचा तिसरा हा प्रयोग आमदार संजय शिंदे यांनी २०१९ मध्ये यशस्वी करून दाखविला. मंत्रिपद नसले तरीही जास्तीचा निधी आणि करमाळ्यातील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यात आमदार संजय शिंदे यशस्वी ठरत आहेत. अजितदादांचे विश्‍वासू दूत म्हणून असलेली आमदार शिंदेंची ओळख सुरवातीला महाविकासच्या सरकारमध्ये व आता शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये उपयुक्त ठरली आहे. करमाळ्याच्या मैदानात आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे अधिक लक्ष असल्याने २०२४ साठी ‘एकास एक’चा प्रयोग होण्याची शक्यता आहे. माघार कोण घेणार? बागल की पाटील? यावर बरेच काही अवलंबून आहे.

माळशिरस

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना २०१९ मध्ये माळशिरसमधून एक लाखांचा लीड देण्यात उत्तम जानकरांचा वाटा किती? याचे कोडे सुटण्यापूर्वीच जानकर पुन्हा एकदा राज्यातील सत्तेच्या माध्यमातून मोहिते-पाटलांचे सत्तेचे सोबती झाले आहेत. २०१९ मध्ये आमदार राम सातपुते यांच्या विरोधात लढताना जानकरांची आमदारकी अवघ्या २५९० मतांनी हुकली, ‘अब की बार चेअरमन आमदार’ अशी शक्यता असताना २०२४ च्या लढतीपूर्वीच मोहिते-पाटील-सातपुते-जानकर सत्तेच्या सावलीत सध्या तरी विसावलेले दिसत आहेत. २०२४ च्या खासदारकीत माळशिरसची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता असल्याने या मतदार संघावर भाजप व अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अधिक लक्ष दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com