
मंगळवेढा : घरकुल बांधकामाला मोफत वाळू द्यावी,बिगर पावतीची वाळू वाहतूक बंद करावी यासह अन्य मागण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने येथील उपविभागीय कार्यालयासमोर महाराष्ट्र दिनापासून आंदोलन सुरू असून प्रशासनाने या आंदोलनाकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलकातून प्रशासनाच्या गलथान कारभाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने अनिल सावंत यांनी पाठिंबा दिला.