
मोहोळ : हे सरकार आल्यापासून संपूर्ण आरोग्य यंत्रणा ठप्प झाली आहे. ग्रामीण रुग्णालयात वॉर्डबॉय नाहीत, सफाई कामगार नसल्याने अस्वच्छता आहे. सोलापूरच्या सिव्हिलची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही, त्यापेक्षा ही आरोग्य सेवाच बंद करण्यासाठी वरिष्ठांना कळवा, काही दिवसांनी रुग्णांच्या नातेवाइकांनाच तुम्हीच आता शवविच्छेदन करा असे सांगतील, अशा शब्दांत खासदार प्रणिती शिंदे यांनी संताप व्यक्त केला.