
सोलापूर : कोनापुरे चाळ आणि राहुल गांधी झोपडपट्टीतील नागरिकांना पक्की घरे बांधून देण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्यासह या परिसराला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. तसेच नागरिकांना विश्वासात घेऊन याचा प्रारूप आराखडा लवकर तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावे, अशा सूचना प्रशासनाला दिले.