
Pranjali Yerikar Social Work: एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या वडिलांचं छत्र लहानपणीच हरपलेले, तरीही विक्री कर अधिकारी असलेल्या आईनं प्रोत्साहन दिले. स्थापत्य अभियांत्रिकीत पदवी मिळविल्यानंतर स्वतःचा बांधकाम व्यवसाय सुरू केलेला. त्यात जम बसत असतानाच केवळ पैशात आनंद, समाधान नाही, हे ओळखले. स्वामी विवेकानंदांच्या ‘रुपया माणूस घडवत नाही, मनुष्यच रुपया निर्माण करतो’, हा विचार मनी बाळगून संपूर्ण जीवनच प्रांजली येरीकर म्हणून मानव सेवेसाठी समर्पित केले. ही असामान्य सेवागाथा आहे, सोलापूरच्या प्रांजली येरीकर या सामान्य युवतीची.