
Solapur News: सोलापूर जिल्ह्यासह राज्यात गेल्या दहा दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढला आहे, ज्यामुळे वीज पडण्याच्या घटना वाढत आहेत. मॉन्सून सक्रिय होण्याच्या एक महिना आधीच अवकाळी आणि पूर्वमोसमी पावसाच्या काळात वीज कोसळण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. याच कालावधीत शेतीतील मशागतीची कामे होत असल्याने पशुधनासह मानवी जीवितहानी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे विजांपासून सुरक्षेसाठी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.