

Solapur ZP School
Sakal
सकाळ वृत्तसेवा शासन आदेशानुसार जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना सुविधा देण्यासाठी वर्गवारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिक्षण विभागाने केलेल्या वर्गवारीनुसार अ वर्गात १२६, ब वर्गात ९१४, क वर्गात ९८९, तर ड वर्गात ६७२ शाळा आढळून आल्या आहेत. क व ड वर्गातील शाळांना सुविधा देण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली. यामध्ये क वर्गातील ९८९ शाळांना संरक्षक भिंती व वर्गखोल्यांची दुरवस्था, तर ६७२ शाळांमध्ये वीज, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहासह इतर सुविधा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.