Solapur : तुरुंगात कैद्यांच्या क्षमतेपेक्षा चौपट गर्दी; सोलापूर मध्यवर्ती कारागृहात ४३१ कैदी

नात्यांचा विसर अनेकांना पडला असून, छुल्लक कारणांसाठी काहींनी स्वत:च्या आई-वडिलांचा, आजीचा देखील खून केल्याची उदाहरणे आहेत.
सोलापूर मध्यवर्ती कारागृहात ४३१ कैदी
सोलापूर मध्यवर्ती कारागृहात ४३१ कैदीSakal

Solapur News : येथील मध्यवर्ती कारागृहात घरफोडी, खून, हाणामारी, महिला अथवा तरुणीवर अत्याचार, विनयभंग, चोरी-दरोडा अशा विविध गुन्ह्यांतील तब्बल ४३१ कैदी आहेत. त्यात महिला कैद्यांचाही समावेश आहे. वास्तविक पाहता या कारागृहाची क्षमता अवघी १४१ कैद्यांचीच आहे.

दरवर्षी साधारणतः गुन्हेगारीत १० टक्के वाढ होते. किरकोळ कारणातूनही अनेकजण कायदा हातात घेऊ लागले आहेत. नात्यांचा विसर अनेकांना पडला असून, छुल्लक कारणांसाठी काहींनी स्वत:च्या आई-वडिलांचा, आजीचा देखील खून केल्याची उदाहरणे आहेत. दरम्यान, पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर न्यायालयातून शिक्षा होईपर्यंत कैदी सोलापूरच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवले जातात.

सध्या सोलापूर कारागृह कैद्याने तुडुंब भरल्याने अनेक कैदी न्यायालयाच्या आदेशाने कोल्हापूरच्या मध्यवर्ती कारागृहात देखील पाठविण्यात आले आहेत. खटल्याचा निकाल झाल्यावर शिक्षा लागलेल्या कैद्यांची रवानगी पुण्यातील येरवडा कारागृहात केली जाते.

सोलापूर शहर-जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांतील ४३१ कैदी मध्यवर्ती कारागृहात कैद आहेत. दरम्यान, आता शासनाकडून निधी मिळाल्यानंतर तुरुंगाचा विस्तार केला जात असून, हे काम पूर्ण झाल्यावर त्याठिकाणी २४० कैदी आणखी बसू शकणार आहेत. तुरुंगात राहण्यापेक्षा गुन्हा न करता, किंवा कायदा हातात न घेता प्रत्येकानी आनंदाने राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

कारागृहात ३९ महिला कैदी तर एकाकडे बालक

सोलापूर मध्यवर्ती कारागृहात एकूण ३९ महिला कैदी असून, त्यातील एका महिला कैद्याकडे लहान बाळ देखील आहे. सहा वर्षांपर्यंतच्या चिमुकल्याला महिला कैदी स्वत:जवळ ठेऊ शकते. तुरुंगात महिला कैद्यांची व्यवस्था स्वतंत्र असते. कैद्यांच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी मुभा दिली जाते, पण त्यासाठी तुरुंग प्रशासनाची रीतसर परवानगी घ्यावी लागते.

सोलापूर मध्यवर्ती कारागृहाची सध्याची क्षमता १४१ कैद्यांची असून, आता नव्याने २४० कैदी राहतील अशी व्यवस्था केली जात आहे. त्याचे बांधकाम सुरू असून चार-पाच महिन्यात ते पूर्ण होईल. त्यानंतर कैद्यांची दाटीवाटी होणार नाही.

- हरिभाऊ मिंड, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com