Solapur : मोहोळ शहरासह ग्रामीण भागातील विविध समस्या लवकरच मार्गी लावू - सिद्धेश्वर महास्वामी

मोहोळ येथे घर घर संपर्क अभियान संपन्न
problems of Mohol city and rural areas resolved soon jai Siddheshwar Mahaswami politics
problems of Mohol city and rural areas resolved soon jai Siddheshwar Mahaswami politicssakal

मोहोळ : शहरातील उपजिल्हा रुग्णालय, शहरासाठी आष्टी तलावातून पाणीपुरवठा योजना, या सह ग्रामीण भागातील रस्ते, गटारी हे प्रश्न आगामी काळात मार्गी लावू असे प्रतिपादन भाजपाचे खासदार डॉ जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी केले.

मंगळवार ता 11 रोजी मोहोळ शहरात "घर घर संपर्क अभियान" राबविण्यात आले, त्यावेळी खासदार महास्वामी बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभियानाची सुरुवात करण्यात आली.

शहरातील मुख्य रस्त्यावरील बाजारपेठ, तहसील कार्यालय आवारातील नागरिक, विविध व्यवसायिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात केलेल्या कामाचा लेखा जोखा माहिती पत्रकाव्दारे नागरीकांना खा स्वामी यांच्या हस्ते वाटण्यात आली.

problems of Mohol city and rural areas resolved soon jai Siddheshwar Mahaswami politics
Solapur : गरीब कुटुंबातील चिमुकल्यांच्या नशिबी एकच गणवेश

यावेळी खा महास्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन देण्याकरिता विशिष्ट मोबाईल नंबर वरून मिस कॉल देण्याचे आवाहन केले. यावेळी अभियानाचे संयोजक तथा भाजपाचे शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर म्हणाले, शहरातील 27 मतदान केंद्रासह मोहोळ विधानसभा मतदार संघातील एकूण 329 मतदान केंद्रावर हे अभियान राबविले जाणार आहे.

यासाठी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, शक्ती बूथ प्रमुख हे परिश्रम घेत आहेत. मंगळवारी राबविलेल्या अभियानात बाबा जाधव, नागेश क्षीरसागर, बाळासाहेब पाटील, मुजीब मुजावर, विष्णू चव्हाण, सतीश पाटील, सतीश काळे,

problems of Mohol city and rural areas resolved soon jai Siddheshwar Mahaswami politics
Solapur : गरीब कुटुंबातील चिमुकल्यांच्या नशिबी एकच गणवेश

दीपक पुजारी, जगन्नाथ वसेकर, दगडु डोंगरे, अभिमान शिंदे, विशाल डोंगरे, सागर लेंगरे, गुरुराज तागडे, द्रोणाचार्य लेंगरे, चंद्रकांत बरकडे, छगन अष्टुळ, उमेश चव्हाण, प्रशांत माने, विनोद देशपांडे, पप्पू होनमाने, यांनी सहभाग नोंदविला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com