Bharat Gogawale : रोहयोची मजुरी ४०० रुपये करण्यासाठी देणार प्रस्ताव; राज्याच्या अर्थसंकल्पात करणार तरतूद

येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांच्या मुजरीमध्ये वाढ करण्याचे नियोजन आहे.
bharat gogawale
bharat gogawalesakal
Updated on

पंढरपूर - येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांच्या मुजरीमध्ये वाढ करण्याचे नियोजन आहे. सध्या मजुरांना २९८ रुपये इतकी मजुरी दिली जाते. तुलनेने ही मजुरी अत्यंत कमी आहे.

त्यामुळे येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रोजगार हमीच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांना किमान ४०० रुपये मजुरी द्यावी, असा नवा प्रस्ताव मांडला जाणार आहे, अशी माहिती रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी आज पंढरपुरात दिली.

मंत्री गोगावले हे आज विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. विठ्ठल दर्शन झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही मजुरीत वाढ करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. याशिवाय पाणंद रस्त्यांची काम ही लवकरच नव्याने सुरू केली जातील. ज्या ठिकाणी अडचणी आहेत.

त्या ठिकाणी मार्ग काढून नव्याने आदेश घेऊन अपूर्ण कामे पूर्ण केली जातील, असेही गोगावले यांनी वेळी स्पष्ट केले. रायगड आणि नाशिक येथील पालकमंत्र्यांचा तिढा सुटावा, असे विठ्ठल रुक्मिणीकडे साकडे घातले आहे. एकदोन दिवसांत पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेल, अशी आशा आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी मंत्री भरत गोगावले यांचा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार राजू खरे, राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील, शिवसेनेचे महेश साठे, भाजपचे तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, माजी नगरसेवक डी. राज सर्वगोड, तहसीलदार सचिन लंगोटे आदी उपस्थित होते.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी मंत्री गोगावले म्हणाले,की कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते, ती मर्यादा आता संपली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे हे एकत्रित बसून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत लवकरच अपेक्षित निर्णय घेतील.

ठाकरे गटाच्या आमदारांना पर्याय नाही

कोकणातून शिवसेना हद्दपार झाली आहे. ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याची वेळ निघून गेल्याने उद्धव ठाकरे यांच्या हातात आता काही शिल्लक राहिले नाही. कोकणात फक्त ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव शिल्लक राहिले आहेत. आमचे संख्याबळ पाहता ठाकरे गटाच्या आमदारांना आमच्याकडे येण्याशिवाय पर्याय नाही, असे संकेतही गोगावले यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com