esakal | महापालिका आयुक्‍तांचा प्रस्ताव ! ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वरांचीही यात्रा नकोच
sakal

बोलून बातमी शोधा

3Solapur_4 (4) - Copy.jpg

15 डिसेंबरपर्यंत नंदीध्वज मार्ग होणार खुले
शहरात स्मार्ट सिटी योजनेतून पिण्याच्या पाईपलाईनसह रस्त्यांची कामे सुरु आहेत. तर अमृत योजनेतून ड्रेनेज लाईन टाकण्याचेही काम सुरु आहे. दुसरीकडे सार्वजनिक आरोग्य अभियंता व पाणी पुरवठा विभागातर्फे पिण्याच्या पाईपलाईन दुरुस्तीसाठी रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर संबंधित यंत्रणांनी 15 डिसेंबरपर्यंत कामे पूर्ण करुन अहवाल आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्याकडे सादर करावा, असे पत्र नगरअभियंता संदीप कारंजे यांनी दिले आहे. नंदीध्वज मार्गावरुन दरवर्षी नंदीध्वजाचा सराव केला जातो. या पार्श्‍वभूमीवर मानकऱ्यांना सराव करता यावा म्हणून कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महापालिका आयुक्‍तांचा प्रस्ताव ! ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वरांचीही यात्रा नकोच

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : शहर- जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता 44 हजारांवर पोहचली असून कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप पूर्णपणे आटोक्‍यात आलेला नाही. फेब्रुवारीत दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविल्याने ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वरांची जानेवारीतील यात्रा साधेपणानेच साजरी व्हावी. यादृष्टीने महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी प्रस्ताव तयार केला असून त्यावर आता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर तो प्रस्ताव मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठविला जाईल, अशी माहिती आयुक्‍त शिवशंकर यांनी दिली.

15 डिसेंबरपर्यंत नंदीध्वज मार्ग होणार खुले
शहरात स्मार्ट सिटी योजनेतून पिण्याच्या पाईपलाईनसह रस्त्यांची कामे सुरु आहेत. तर अमृत योजनेतून ड्रेनेज लाईन टाकण्याचेही काम सुरु आहे. दुसरीकडे सार्वजनिक आरोग्य अभियंता व पाणी पुरवठा विभागातर्फे पिण्याच्या पाईपलाईन दुरुस्तीसाठी रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर संबंधित यंत्रणांनी 15 डिसेंबरपर्यंत कामे पूर्ण करुन अहवाल आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्याकडे सादर करावा, असे पत्र नगरअभियंता संदीप कारंजे यांनी दिले आहे. नंदीध्वज मार्गावरुन दरवर्षी नंदीध्वजाचा सराव केला जातो. या पार्श्‍वभूमीवर मानकऱ्यांना सराव करता यावा म्हणून कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वरांच्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रपदेशातून सुमारे दोन ते तीन लाखांहून अधिक भाविक सोलापुरात दाखल होतात. मात्र,मात्र, देशाच्या आरोग्य संघटनेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली आहे. या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी त्यादृष्टीने स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यासंबंधी सर्व जिल्हा व महापालिका प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत. यात्रेनिमित्त गर्दी झाल्यास सोशल डिस्टन्सिंचे पालन होणार नाही. गर्दीमुळे व शहरातील धुळीमुळे नागरिकांना श्‍वसनाचा त्रास होऊ शकतो. मंदिरे उघडल्याने दर्शनासाठी आतापासूनच मोठी गर्दी होऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वरांचे धार्मिक विधी पंरपंरेनुसार होतील. मात्र, यात्रा साधेपणानेच साजरी करण्यास मान्यता मिळावी, असेही त्या प्रस्तावात नमूद केले जाणार आहे. तत्पूर्वी, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्‍त आणि मंदिर समिती अध्यक्षांसमवेत स्वतंत्र बैठक घेतली जाईल, असेही महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top