मोहोळ (सोलापूर) : मोहोळ येथील दुरवस्था झालेल्या व अनेक सोयीसुविधांचा अभाव असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी 55 लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तो संबंधित विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर यांनी दिली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता विक्रांत बामणे म्हणाले, शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयाची दुरवस्था झाल्याचे पत्र रुग्णालय प्रशासनाकडून मिळाले आहे. अनेक सोयीसुविधांचा अभाव असल्याचेही सांगण्यात आले. मोहोळ हा अपघाती परिसर म्हणून ओळखला जातो. अपघात झालाच तर जखमींना योग्य असे उपचार मिळत नाहीत. त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरला हलवावे लागते. सोलापूरला रुग्णालयात जाईपर्यंत अनेक गंभीर जखमी रुग्णांना जीवही गमवावा लागला आहे. या सर्वांवर उपाय म्हणजे ग्रामीण रुग्णालयाचे नूतनीकरण व सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणे.
दरम्यान, अनेक दिवसांपासून या रुग्णालयातील महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे सोयी सुविधांबरोबरच कर्मचाऱ्यांची रिक्त पदेही त्वरित भरावीत. सध्या हे रुग्णालय 30 खाटांचे आहे, त्याऐवजी ते 50 खाटांचे करावे, अशीही मागणी होत आहे. मंजुरी मिळताच व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच कामाला सुरवात होणार आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाचे रूपडे बदलणार आहे.
पंचावन्न लाख रुपयांच्या निधीतून ही होणार कामे
याबाबत भाजपचे शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर म्हणाले, मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयाची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यासाठी नूतनीकरण आवश्यक आहे. आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर नागरिकांना सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न राहील.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.