Anil Sawant and Bharatsheth Gogawale
sakal
मंगळवेढा - केद्र शासनाच्या व्ही. बी. रामजी योजननेच्या अंमलबजावणीत तालुक्यातील भूमिहीन मजूर, गरजू जॉब कार्डधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणी तातडीने दूर करून या योजनेचा प्रभावी लाभ ग्रामीण जनतेला मिळवून द्यावा, अशी मागणी अनिल सावंत यांनी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.