सोलापूर जिल्ह्यात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी लसीकरणास सुरवात; चोख नियोजन
Pulse polio vaccination campaign in Solapur
Pulse polio vaccination campaign in Solapursakal

सोलापूर : जिल्ह्यात रविवारी (ता.२७) पल्स पोलिओ मोहीम राबविली जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा कृती दलाच्या बैठकीत या मोहिमेचा आढावा घेतला होता. त्यानंतर जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी मोहिमेच्या पूर्वतयारीची माहिती घेतली. ऊसतोड कामगारांच्या बालकांच्या लसीकरणास सुरवात केली.

ऊसतोड कामगारल वीटभट्ट्या तसेच इतर स्थलांतरित कामगार यांच्या पाच वर्षांच्या आतील बालकाचे लसीकरण जिल्हाभरात सुरू झालेले असून जिल्ह्यात चार लाख ५० हजार लाभार्थ्यांना पोलिओ लसीकरण केले जाणार आहे. जिल्हास्तरावर प्रत्येक तालुक्‍यात एक जिल्हास्तरीय अधिकारी तसेच २२ जिल्हास्तरीय पर्यवेक्षक यांच्यामार्फत पर्यवेक्षण केले जाणार असून, उद्या ३००२ ठिकाणी पल्स पोलिओ बूथवर लसीकरण केले जाणार आहे.

जिल्ह्यातील पाच वर्षांच्या आतील बालकांबरोबरच कार्यक्षेत्राबाहेरील पाच वर्षांच्या आतील लाभार्थी, ऊसतोड कामगार, वीटभट्ट्या, बांधकामाची ठिकाणे, एसटी स्टॅंड, मंदिरे याठिकाणीही लसीकरण केले जाईल. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही.

- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर

मोहिमेनंतर लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना पुढे तीन दिवस घरोघरी जाऊन लसीकरण केले जाणार असून एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये याची दक्षता घेतली आहे. एक महिन्याच्या आतील नवजात अर्भकाच्या विशेष नोंदी ठेवण्याबाबत सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत.

- डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्याधिकारी, सोलापूर

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com