दाळ, खाद्यतेलाचे भाव सणासुदीत भडकण्याची शक्‍यता 

turdal.jpg
turdal.jpg
Updated on

सोलापूरः निसर्गाचा फटका, बाजारातील घडमोडी व येणारा सणासुदीच्या काळात दाळ व खाद्यतेल महाग होण्याची शक्‍यता आहे. ठप्प झालेली बाजारपेठेतील उलाढाल वाढली, ग्राहक वाढले तरच काहीसा दिलासा मिळेल असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. 

यावर्षी दाळीच्या उत्पादनांना जोरदार फटका बसला आहे. हंगामाच्या सुरवातीलाच मुगाला पावसाचा फटका बसला. गरजेपेक्षा अधिक पाऊस मुगाच्या पिकाला झाल्याने सत्तर ते एैंशी टक्के माल खराब झाला. माल खराब झाल्याने बाजारात पुरेशा प्रमाणात दाळ होऊ शकली नाही. तुरीच्या दाळीला पर्याय म्हणून मुग दाळीचा उपयोग भरपूर प्रमाणात होतो. मात्र पावसाचा मार बसल्याने अडचण झाली आहे. 

त्यानंतर आता तुरीच्या उत्पादनाकडे बाजारपेठेची आशा लागली आहे. सर्वदूर झालेला जोरदार पाऊस यामुळे आता तुरीचे पीक देखील मोठ्या प्रमाणात येऊ शकते. मात्र पावसाने विश्रांती न घेतल्यास अडचणी येऊ शकतात. 
खाद्यतेलाच्या बाबतीत देखील दरवाढ सुरू झाली आहे. यावर्षी पामतेल फार मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होणार नाही असे मानले जाते. मलेशियातून येणारे पामतेलाच्या उपलब्धतेवर भारत-चीन ताणलेल्या संबंधाचा परिणाम असल्याचे मानले जाते. इतर खाद्यतेलाच्या भावात देखील मागील आठवड्यात तेलाचे भाव पंधरा रुपयांनी वाढले. अजूनही तेलाचे भाव वाढतील असा अंदाज पॅकींग स्वरुपात तेल विकणाऱ्या कंपन्याचा अंदाज आहे. लग्नसराईला कोरोना स्थितीत योग्य परवानगी मिळाली तर हा हंगाम बाजारासाठी उपयुक्त ठरू शकतो. तूर दाळीच्या पुरवठ्याबाबत शासनाकडून काही निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

मुगाच्या दाळीचे उत्पादन घटले 
दाळीच्या उत्पादनात मुगासाठी निसर्गाचा फटका बसला आहे. आता तुरीच्या उत्पादनाकडे लक्ष लागले आहे. डिसेंबरअखेर पर्यंत तुरीच्या उत्पादनाबाबत चित्र स्पष्ट होईल. 
- मनोज भुतडा, दालमिल व्यावसायिक 

बाजारातील उलाढाल वाढणे महत्वाचे 
लॉकडाउननंतर दिवाळी व लग्नसराईचा हंगाम अगदी तोंडावर आहे. कोरोना संकटात झालेल्या नुकसानीनंतर बाजारपेठ स्थिर होण्यासाठी या हंगामाचा उपयोग होईल. याही स्थितीत निदान दिवाळीचा सण चांगल्या पध्दतीने साजरा व्हावा व बाजारातील उलाढाल चांगली व्हावी, अशी अपेक्षा आहे. 
- धवल शहा, सचिव, चेंबर ऑफ कॉमर्स सोलापूर 

दिवाळी व लग्नसराईने चित्र बदलेल 
बाजारात अजुनही ग्राहक अगदी गरजेपुरत्या खरेदीसाठी येतो आहे. त्यामुळे बाजारातील उलाढाल अगदी मर्यादीत झाली आहे. दिवाळी व लग्नसराईने बाजारातील उलाढाली वेग आला तर चित्र बदलू शकते. 
- प्रकाश कलकोटे, किराणा व्यापारी, सोलापूर  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com