
पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आणि एका गँगचा सक्रिय सदस्य शाहरुख उर्फ अट्टी रहीम (वय 23) याचा सोलापूरजवळील लांबोटी गावात पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री केलेल्या धडक कारवाईत ही घटना घडली. या कारवाईने पुण्यातील गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे.