पुणे-सोलापूर महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात ; दोघांचा जागेवरच मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघात

पुणे-सोलापूर महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात ; दोघांचा जागेवरच मृत्यू

लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील फुरसुंगी फाटा चौकातून भापकर मळ्याकडे वळणाऱ्या रस्त्यावर अल्टो गाडीवर वॅक्सवॅगण गाडी आदळून झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले. तर या अपघातात अल्टोमधील तीनजण जखमी झाले आहेत. तीनपैकी दोघांची पृकृती गंभीर असून तिघांना लोणी काळभोर येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. हि घटना गुरुवारी (ता. २८) आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली असून हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

श्रीनीक प्रभाकर होले (वय- २७, रा. यवत, ता. दौंड ) व एक पादचारी चालत निघालेला अनोळखी इसमपुर्ण नाव व पत्ता माहित नाही असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर संकेत बाळासाहेब भंडलकर (वय-२१,) सुनिल निळाराम शितकल (वय-२२, रा. दोघेही केसनंद, ता. हवेली), अनिल बाळासाहेब जाधव (वय-२२, रा. पोंडे, ता. पुरंदर) असे जखमी असलेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी हर्बल संजय चांदणे वय-२६ वर्ष व्यवसाय-अधिकाम व्यवसाय. रा. कवडीपाट,कदमवाकवस्ती, त. हवेली यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (त. २८) हर्शल चांदणे हे त्यांच्या घराकडे संध्याकळी तीन वाजण्याच्या सुमारास जात असताना फुरसुंगी फाटा येथे आलो असता तेथील सिग्नलपाशी पुणे कडून सोलापुरच दिशेला जाणारे फोक्सोगन व्हेन्टो हिथेसमोर मारुती सुझुकी अल्टो ही कार अचानक समोरील बाजुस आल्याने अल्टो कारची केन्टो कारचे पुढील बाजुस जोरात धडक बसली.

त्यावेळी व्हेन्टो कार ही हायवेचे बाजुला असणा-या झाडाला धडकुन पुन्हा पुणे सोलापुर हायवेवर आली व त्यातील इसम हा रोडवर पडला त्यावेळी डोक्यातुन खुप रक्तस्त्राव होऊन तो बेशुध्द झाला होता. सदर आल्टो कारची बाजुने जाणारे एका इसमाला धडक बसल्याने रोडचे बाजुने जाणारा इसम हा रोडचे बाजुला असणारे खड्डात उडुन पडाला त्यावेळी तेथे जमा झालेल्या लोकांचे वरती कढून जमा झालेल्या नागरिकांच्या मदतीने बाजूला घेऊन पोलिसांशी संपर्क साधला.

यावेळी त्याचे खिसे तपासले असता पॅनकार्ड मिळाले त्यावर त्याचे नाव श्रीनीक प्रभाकर होले असे आढळून आले. तसेच अल्टो कारमधून सुनिल निलेश शितकलव संकेत मंडलकर यांन गाडीच्या बाहेर काढले. त्यानंतर ११२ नंबरवर फोन करून मदत मागितली त्यावेळी त्याठिकाणी हडपसर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी तात्काळ लोणी काळभोर येथील रुगणालयात सर्वाना हलविले. मात्र श्रीनीक प्रभाकर होले याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

श्रीनीक होले होते नामांकित व्यवसायिक

यवत येथील श्रीनीक प्रभाकर होले हे यवत परिसरात नामांकित बांधकाम व हार्डवेअर व्यावसायिक होते. तसेच त्यांचे यवत येथे माउली हार्डवेअर नावाने हार्डवेअरचे दुकान आहे. त्यांच्या जाण्याने यवत परिसरावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Pune Solapur Highway Terrible Accident Two Killed And Three Seriously Injured Loni Kalbhor

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top