Railway: पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस 17 ऑक्टोबर पर्यंत रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Solapur Hutatma Express

हुतात्मा एक्‍सप्रेस बंद असल्याने पुण्याकडे जाणा-या सोलापूरच्या प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस 17 ऑक्टोबर पर्यंत रद्द

सोलापूर: सोलापूर रेल्वे विभागांत दौंड ते भाळवणी सेक्शन दरम्यान सुरु असलेल्या दुहेरीकरनाच्या कामांमुळे पुणे -सोलापूर -पुणे धावणारी विशेष (हुतात्मा एक्सप्रेस ) चौथ्यांदा रद्द करण्यात आली. ही गाडी आता 3 ते 17 ऑक्टोबर पर्यंत रद्द करण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी 'सकाळ' शी बोलताना दिली.

हेही वाचा: सोलापूर: चालक पोलिस शिपाई पदासाठी 1 ऑक्‍टोबरला परीक्षा

भाळवणी जवळ दुहेरीकरनाचे काम अंतिम टप्यात आले आहे. काम कारण्याठी इंजिनियरींग ब्लॉक घेण्यात आला आहे. परिणामी रेल्वे प्रशासनाने गाडी रद्द केली आहे. 3 ते 17 ऑक्टोबर दरम्यान ज्या प्रवाशांनी हुतात्मा एक्सप्रेसचे आरक्षित तिकीट काढले आहे. त्यांनी ते रद्द करून आपल्या तिकिटाचा पूर्ण परतावा घ्यावा असे आवाहन ही रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

भाळवणी ते भिगवण दरम्यान दुहेरीकरणाबरोबर विद्युतीकरणाचे काम देखील ब्लॉक दरम्यान केले जात असल्याची माहिती आरव्हीएनएलच्या अधिका-यांनी दिली. हुतात्मा एक्‍सप्रेस बंद असल्याने पुण्याकडे जाणा-या सोलापूरच्या प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खाजगी वाहनांचे भाडे जास्तीचे असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नसल्याच्या प्रतिक्रिया सामान्य प्रवाशांनी सकाळशी बोलताना व्यक्‍त केल्या आहेत. त्यामुळे आणखीन काही दिवस तरी हुतात्मा एक्‍सप्रेसने प्रवास करण्यासाठी सोलापूरकरांना प्रतिक्षाच करावी लागणार आहे. भाळवणी आणि भिगवण दरम्यान सुरु असलेल्या कामाची देखभाल आणि दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

हेही वाचा: सोलापूर : मच्छिमारामुळे ड्रायव्हरला मिळाले जीवदान

काय केले जाणार काम

भाळवणी ते भिगवण या 55 किमीच्या सेक्‍शनमध्ये दररोज ब्लॉक घेऊन दुहेरीकरणाचे काम केले जाणार आहे. यासाठी बलास्ट मशीनव्दारे नवीन खडी टाकली जाणार आहे. रुळाखाली खडीचा एक फुटाचा थर टाकला जाणार आहे. त्याचबरोबर स्लीपर टाकल्यानंतर रुळ टाकले जाणार आहे. त्याचबरोबर विद्युतीकरणाचे खांब लावले जाणार आहेत. त्यानंतर वायर ओढली जाणार आहे. ही सर्व कामे दोन टप्प्यात चालणार आहेत. सिग्नल आणि पॉईंट एकमेकांस जोडले जाणार आहेत. सर्व पॉईंट हे स्टेशन मास्तर यांच्याकडून ऑपरेट होतात की नाही याची पाहणी केली जाणार आहे.

दुहेरीकरणाचे कामासाठी इंजिनिअरिंग ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे हुतात्मा एक्‍सप्रेस रदद करण्यात आली आहे. जसे दुहेरीकरणाचे आणि विद्युतीकरणाचे काम सुरु होताच गाडी सुरु करण्यात येईल.

- प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर

loading image
go to top