

Pune Teachers Constituency
esakal
पंढरपूर - पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापू लागले आहे. माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी यावेळी अपक्ष निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. "माझ्यासाठी भाजपा बरोबरच महाविकास आघाडीचे दरवाजे खुले आहेत, लवकरच निर्णय जाहीर करेन," असे विधान सावंत यांनी केल्याने शिक्षक मतदारसंघात चर्चांना उधाण आले आहे.