esakal | "शालार्थ'चा अद्यापही खोळंबाच; 2500 शिक्षकांच्या पगाराचा प्रश्‍न चिघळणार 
sakal

बोलून बातमी शोधा

"शालार्थ'चा अद्यापही खोळंबाच; 2500 शिक्षकांच्या पगाराचा प्रश्‍न चिघळणार 

शिक्षण आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज 
शिक्षकांच्या माहित्या "शालार्थ' प्रणालीत ऑनलाइन भरण्यास सातत्याने टाळाटाळ केली जात आहे. याविषयी सातत्याने पाठपुरावा करूनही काहीच हाती लागत नाही. त्यामुळे या प्रकरणात शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी लक्ष देण्याची मागणी शिक्षकांमधून केली जात आहे. 

"शालार्थ'चा अद्यापही खोळंबाच; 2500 शिक्षकांच्या पगाराचा प्रश्‍न चिघळणार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः पुणे विभागातील अंशतः अनुदान घेत असलेल्या शाळेतील जवळपास अडीच हजार कर्मचाऱ्यांची माहिती अद्यापही "शालार्थ'मध्ये भरलेली नाही. त्यामुळे त्यांचे वेतन मार्चअखेरपर्यंत ऑफलाइन करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, ऑनलाइन माहिती भरण्यास शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. 

"शालार्थ'मध्ये माहिती न भरल्यामुळे 20 टक्के अनुदान घेणाऱ्या शिक्षकांची पगार बंद झाली आहे. पण, शासनाने मार्चअखेरपर्यंत त्या शिक्षकांच्या ऑफलाइन पगारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मार्च महिन्याचा पहिला आठवडा मध्यावर आला आहे. पण, अद्यापही ऑनलाइन माहिती भरण्याचे काम सुरू झाले नाही. मार्चअखेरपर्यंत ही माहिती ऑनलाइन न भरल्यास पुन्हा त्या शिक्षकांची पगारी बंद होणार आहेत. शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कुणाचाच अंकुश नसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याची चर्चा शिक्षकांमध्ये आहे. 

राज्याच्या शिक्षण संचालकांनी सगळ्या विभागाच्या उपसंचालकांना व शिक्षण अधिकाऱ्यांना प्रलंबित असलेले शालार्थ "आयडी'चे काम 12 व 13 जानेवारीला शिबिर घेऊन पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यादिवशी काहीच न करता संचालकांच्या पत्राला केराची टोपली दाखविली आहे. 
पुण्याच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी जिल्हा परिषद किंवा शिक्षण उपसंचालक या दोन्ही कार्यालयातच संगनमताने आपसी बदली करून घेतात. त्यामुळे ते कुणालाही जुमानत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यावर योग्य तो तोडगा काढणे गरजेचे झाले आहे. जर चालू महिन्यात शालार्थ आयडीचे काम पूर्ण न झाल्यास त्या शिक्षकांचे पुढील महिन्यापासूनचे पगार पुन्हा बंद होणार आहेत. 

loading image