Solapur : खुशखबर! सोलापूर-दिल्लीसाठी धावणार शुक्रवारपासून नवी रेल्वे

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखविला हिरवा झेंडा; हुबळी ते हजरत निजामुद्दीनदरम्यान साप्ताहिक एक्स्प्रेस
solapur railway
solapur railwaysakal
Updated on

सोलापूर : सोलापूरकर आता दिल्ली गाठण्यासाठी केवळ केके अर्थात कर्नाटक एक्स्प्रेसवर अवलंबून असणार नाहीत. कारण, हुबळी- हजरत निजामुद्दीन साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेसला मंगळवार संसदीय कार्यमंत्री, कोळसा आणि खाणमंत्री प्रल्हाद जोशी व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे हिरवा झेंडा दाखविला असून, ही गाडी सोलापूरमार्गे धावणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांसाठी नवी दिल्लीला जाण्यासाठी आणखी एक गाडी उपलब्ध झाल्याने सोलापूरकरांची सोय झाली आहे.

विशेष म्हणजे, ही गाडी हुबळी येथून २०६५७ या क्रमांकाने शुक्रवारी (ता. १४) रात्री ११.५० वाजता निघेल व हजरत निजामुद्दीन स्थानकावर रविवारी (१६) सकाळी १०.४० वाजता पोचेल. तसेच हजरत निजमुद्दीन स्थानकावरून २०६५८ या क्रमांकाने रविवारी (ता. १६) दुपारी ३.५५ वाजता सुटेल. या रेल्वेगाडीला एकूण २२ एलएचबी डबे असणार आहेत. त्यामुळे सोलापूरकरांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

ही गाडी हुबळी येथून शुक्रवारी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सुटेल. गदग रात्री एक वाजता, बदामी रात्री २.१२, बागलकोट रात्री २.५३, विजयपूर पहाटे ५.२५ तर सोलापूरला सकाळी ८ वाजून ३५ मिनिटांनी पोचेल. पाच मिनिटांचा थांबा घेऊन ८ वाजून ४० मिनिटांनी कुर्डुवाडीकडे रवाना होईल. कुर्डुवाडी सकाळी ९.४०, दौंड ११.१०, अहमदनगर दुपारी १२.३५, कोपरगाव, मनमाड, भुसावळ खांडवा, इटारसी, राणी कमलापती (भोपाळ), बिना, वीरांगना लक्ष्मीबाई जंक्शन (झांशी), ग्वाल्हेर, आग्रा आदी ठिकाणी थांबा घेऊन ही गाडी रविवारी सकाळी निजामुद्दीनला १०.४० वाजता पोचणार आहे.

तर निजामुद्दीन येथून रविवारी दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी गाडी निघेल. आग्रा, ग्वाल्हेर, वीरांगना लक्ष्मीबाई जंकशन (झांशी), बिना, राणी कमलापती (भोपाळ), इटारसी, खंडवा, भुसावळ, मनमाड, कोपरगाव सकाळी १०.१८, अहमदनगर दुपारी १२.१०, दौंड ४.२५, कुर्डुवाडी ५.५३ तर सोलापूरला सायंकाळी सात वाजता येईल. ७ वाजून ५ मिनिटांनी हुबळीकडे रवाना होईल. विजयपूरला रात्री ९.४० वाजता, बागलकोट १०.४३, बदामी १२.०९, गदग २.२० आणि मंगळवारी पहाटे ४ वाजता हुबळी स्थानकावर पोचेल.

सोलापूरहून दिल्लीकरिता पूर्वी फक्त कर्नाटक एक्स्प्रेसचाच पर्याय होता, ज्यामधे बाराही महिने वेटिंग लागत असे. पण नवीन रेल्वे गाडीमुळे दिल्लीला जाण्याकरिता उत्तम पर्याय उपलब्ध झाला असून, सोलापूरसह जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे. या गाडीला आठवड्यातील फेरे वाढविण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.

- कनिष्क बोकेफोडे, प्रवासी

हुबळी-हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडीला ११ ऑक्टोबर रोजी हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. ही गाडी साप्ताहिक असणार आहे.

- अनिष हेगडे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, दक्षिण-पश्चिम रेल्वे

डब्यांची रचना

एक प्रथम श्रेणी वातानुकूलित, दोन द्वितीय श्रेणी अनारक्षित डबे, दोन पॉवर कार, १० स्लीपर (शयनयान) डबे, तीन वातानुकूलित थ्री टियर डबे, दोन वातानुकूलित टू टियर डबे, एक पेंट्री कार, एक उच्च क्षमतेची पार्सल व्हॅन असे एकूण २२ एलएचबी डबे असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Professors will now mark biometric attendance in class biometric attendance
solapur Police Raid on MD Drugs
Mumbai-Mantralay
A total of 1,667 beneficiaries availed government schemes and services at the Chhatrapati Shivaji Maharaj Revenue Samadhan Camp in Mohol, where 17 departments offered citizen-centric services under one roof.
Marathi News Esakal
www.esakal.com