Railway : हिवाळ्यातील ‘हेअर क्रॅक’साठी रेल्वेची यंत्रणा सतर्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway

Railway : हिवाळ्यातील ‘हेअर क्रॅक’साठी रेल्वेची यंत्रणा सतर्क

सोलापूर : हिवाळ्यात रेल्वे रुळाला तडे अर्थात (हेअर क्रॅक) येतात. अशा घटना योग्यवेळी लक्षात न आल्यास रेल्वेचा अपघात होण्याची शक्यता असते. त्यासाठी सोलापूर विभागातील रेल्वेची यंत्रणा हेअर क्रॅकच्या दुरुस्तीच्या कामासाठी सतर्क झाली आहे. रेल्वे रुळांची प्रत्यक्ष देखभाल करणाऱ्याकडे गॅंगमनला लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

दरम्यान रेल्वे रुळांच्या देखभालीचे काम गॅंगमन करतात. अनेकदा गॅगमनने सतर्कता दाखविल्यामुळे होणारे अपघात टळले आहेत. हिवाळ्यात थंडीमुळे रेल्वे रुळांमध्ये हेअर क्रॅक होण्याची भीती असते. रेल्वे रुळ तडकल्यामुळे आणि या घटना वेळीच लक्षात न आल्यास रेल्वे रुळावरून घसरून अपघात होण्याची दाट शक्यता असते.

त्यामुळे हिवाळ्यात हेअर क्रॅकच्या घटनांवर बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना गॅंगमनला देण्यात आल्या आहेत. याशिवाय गॅंगमन रेल्वे रुळाच्या नटबोल्टकडे लक्ष देत असून, दुरुस्ती असेल तर ते करीत आहेत. त्याचबरोबर नाईट पेट्रोलिंग ही वाढविण्यात आले आहे. युएसएफडी मशीनने नियमित देखभाल करण्यात येत आहे. हेअर क्रॅकची घटना त्वरित लक्षात यावी, यासाठी रेल्वेकडून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेअर क्रॅक म्हणजे काय?

हिवाळ्यात थंडीमुळे रेल्वे रूळ अकुंचन पावतात व रुळाला तडे जातात याला ‘हेअर क्रॅक’ म्हणतात. यामुळे रेल्वे घसरून अपघात होण्याची शक्यता असते. यासाठी गॅंगमनची रात्रीची ग्रस्त वाढवली असून, यावर वेळीच उपाययोजना केल्या जात आहेत.

ठळक बाबी....

एक महिन्यात केले जाणार काम पूर्ण

१५० ट्रॅकमॅनकडून होणार पाहणी

रात्री पेट्रोलिंगसाठी १९ जणांची टीम

गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जीपीएसद्वारे असणार वॉच

रात्री ११ ते सकाळी ७ पर्यंत असणार केली जाणार गस्त

हिवाळा ऋतू सुरू झाला असून, रेल्वे रूळांना हेअर क्रॅंक होण्याची शक्यता असते. त्यासाठी रेल्वेकडून विशेष काळजी घेतली जात आहे. रात्री नाईट पेट्रोलिंग वाढविण्यात आली आहे. गरज भासल्यास ट्रॅक रिन्यूअल करण्यात येणार आहेत. तसेच गॅंगमनला यांना लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- एल. के. रणयेवले, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर