
गणेश कांबळे
Solapur: जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. क्रीडा संकुलांसह विविध मैदानांना पावसाच्या पाण्यामुळे अक्षरशः तळ्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशातच सुट्ट्यांमुळे घरी असलेले शालेय मुले कॅरम खेळाचा डाव मांडत आहेत. मैदानांवर सर्वत्र पाणी साचले आहे. चला तर मग आता खेळू असे म्हणत कॅरम खेळत वेळ दवडत आहेत. अवकाळीमुळे मैदानी खेळांमध्ये व्यत्यय येत असल्याने मुले बुद्धिबळासाख्या खेळांना प्राधान्य देत आहेत.