Mangalwedha News : मंगळवेढ्यात बेदाणा तयार करण्याची प्रक्रिया जोमात; शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा

यंदा द्राक्ष घडात साखर चांगली भरली आहे. अनुकूल वातावरण असल्याने आगाप धरलेल्या द्राक्ष बागांचा बहार उतरणीला आला आहे.
Raisin
RaisinSakal

सलगर बुद्रुक - यंदा द्राक्ष घडात साखर चांगली भरली आहे. अनुकूल वातावरण असल्याने आगाप धरलेल्या द्राक्ष बागांचा बहार उतरणीला आला आहे. त्यामुळे मंगळवेढ्यात द्राक्ष घड वेलीपासून उतरवून त्याची बेदाणा निर्मितीची प्रक्रिया जोमात सुरू झाली आहे.

मजुरांच्या हाताला काम -

सततची दुष्काळी परिस्थिती व पिन होल बोरर मुळे मंगळवेढ्यातील डाळींब बागायती क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे डाळींब बागांची कामे करणाऱ्या शेतमजूरावर उपासमारीची वेळ आली होती. पण ज्वारी काढणी मुळे व आता द्राक्ष काढणीमुळे मजुरांच्या हाताला काम मिळायला सुरवात झाली आहे. महिला मजुरांना 400 तर पुरुषांना 500 रुपये रोजगार मिळत आहे.

बेदाणा दर जैसा थे -

दरम्यान मागील वर्षी बेदाण्याला चांगला भाव मिळाला नव्हता. त्यामुळे उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या अंगावर आला होता.प्रति किलो सरासरी 110 ते 130 रुपयांचा दर मागील वर्षी मिळाला होता. पण चालू वर्षीही या प्रमाणातच बेदाण्याचा दर असल्याने शेतकऱ्यांना दराची चिंता आहे. मागील वर्षापेक्षा यंदा द्राक्षांचे उत्पादन कमी आहे. अवकाळी पाऊस व खराब हवामानामुळे द्राक्ष बागांचे खूप नुकसान झाले होते. त्यामुळे उत्पादन कमी असल्याने बेदाण्याच्या दरात वाढ होईल असा शेतकऱ्यांचा आशावाद आहे.

पांडुरंग चव्हाण ,द्राक्ष उत्पादक शेतकरी सलगर बुद्रुक -

मागील वर्षी बेदाणा दर पडल्याने आमचे खूप नुकसान झाले. चालू वर्षी द्राक्ष उतारा कमी आहे.अवकाळी व खराब हवामानामुळे द्राक्ष शेतीचे खूप नुकसान झाले होते. यावर्षी तरी बेदाण्याला चांगला दर मिळेल अशी आशा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com