
उ. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात प्रति आदमापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेलाटी येथील श्री संत बाळूमामा मंदिराच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली. सोमवारी सकाळी शिंदे यांच्या हस्ते मंदिराच्या सभा मंडपाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.