
करमाळा : पोथरेत माझं बालपण गेले. या गावातील अनेक आठवणी आहेत. या गावात माझे बालपण गेले नसते तर मी या पदापर्यंत गेलो नसतो, एवढे उपकार या गावचे माझ्यावर आहेत. पोथरे हे माझ्या जीवनाला दिशा देणारे गाव आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.