
सोलापूर : सध्या शेतीमध्ये खर्च कमी करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. यासाठी शेतकऱ्यांनी व ग्राहकांनी सेंद्रिय शेतीची वाट धरावी लागेल. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. सर्वसामान्य जनतेला सामाजिक न्याय देणे शेतकऱ्याचे कल्याण करण्यासाठी केंद्र सरकार प्राधान्य देत असल्याची माहिती केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.