विधानपरिषदेसाठी भाजपकडून रणजीतसिंह यांचे नाव अंतिम

Ranjitsingh name is final from BJP for the Vidhanparishad
Ranjitsingh name is final from BJP for the Vidhanparishad

सोलापूर : भाजपकडून विधानपरिषदेसाठी माजी खासदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांचे नाव अंतिम केले आहे. राज्यातील होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने चार उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यामध्ये रणजितसिंह मोहिते- पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. मोहिते-पाटील यांच्या समावेशाने भाजपने अखेर त्यांना न्याय दिल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये व्यक्त केली जात आहे. 
लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी खासदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याच वेळी त्यांचे वडील माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे मात्र भाजपमध्ये आले नव्हते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जंगी सभा अकलूज मध्ये घेतली होते. त्यावेळी विजयसिंह मोहिते-पाटील पंतप्रधान मोदी यांच्या व्यासपीठावर उपस्थित होते. त्यानंतर माढा लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस कडून खेचून आणण्यात मोहिते-पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. लोकसभेला एकट्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून एक लाखाच्या पुढे मताधिक्य खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळवून देण्यात मोहिते-पाटील यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्याची दखल भाजपने घेत रणजीतसिंह यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. 
सोलापूर जिल्ह्यात मोहिते-पाटील समर्थकांचे मोठे जाळे आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांच्या गटाचे कार्यकर्ते पहिल्यापासून सक्रिय आहेत. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात भाजप वाढीसाठी आता मदत होणार आहे. मोहिते-पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सोलापूर जिल्ह्यातील भविष्यातील राजकारण हे मोहिते-पाटील कुटुंबाशी पुन्हा एकदा आकर्षित होते की काय याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. 

विधान परिषदेच्या भाजपच्या 3 जागा रिक्त होत आहेत. पण भाजपने चार जणांची उमेदवारी यादी जाहीर केली आहे. भाजपच्या तीन जागा सहज निवडून येऊ शकतात. पण चौथी जागा निवडून येण्यासाठी भाजपला जवळपास अकरा मतांची आवश्यकता भासणार आहे. ही 11 मत भाजप कुठून मिळणार यावर बरेच काही अवलंबून आहे. भाजपकडे सध्या 105 आमदार आहेत. एक जागा निवडून येण्यासाठी जवळपास 29 एवढ्या मतांच्या आवश्यकता आहे. चार जागांचा विचार केला तर 116 मतांची गरज भाजपला लागणार आहे. मात्र, त्यांच्याकडे 105 आमदार आहेत. उर्वरित 11 मते भाजप कशी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. 

भाजपची ताकद आणखी वाढणार
भाजपचे जिल्ह्यात चार आमदार व दोन खासदार आहेत. त्यातच आता रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी दिल्याने ते निवडून आल्यानंतर भाजपच्या आमदारांची संख्या एक ने वाढून ती पाच इतकी होणार आहे. त्याचा निश्चितच फायदा भाजप जिल्ह्यात वाढण्यासाठी होण्याची शक्यता आहे. कदाचित त्यामुळेच भाजपने रणजीतसिंह यांना उमेदवारी दिली असावी, अशी शक्यताही वर्तविली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com