मंगळवेढा - शहरातील प्रमुख असलेल्या रतनचंद शहा सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या 11 जागेसाठी 13 उमेदवाराचे अर्ज आखाड्यात राहिले तर 4 जागा बिनविरोध झाल्या. 14,932 सभासदांचा कौल 27 जुलै रोजी होणाऱ्या मतदानातून स्पष्ट होणार आहे. निवडणूक ही औपचारिकता आहे. बँकेवर शहा घराण्यातील तिसऱ्या पिढीचे वर्चस्व कायम राहणार आहे.