'ई-श्रम'वर करा नोंदणी! दरमहा मिळेल तीन ते पाच हजारांची पेन्शन व निवृत्ती वेतन

सर्वसामान्य, हातावरील पोट असलेल्यांसह असंघटित कामगारांसाठी केंद्र सरकारने विविध योजना सुरु केल्या. योजनांच्या लाभासाठी 'ई-श्रम'द्वारे नोंदणी करावी लागते. काही योजनांचा लाभ बॅंकांच्या माध्यमातून दिला जातो.
ई-श्रम पोर्टल
ई-श्रम पोर्टलsakal
ई-श्रम पोर्टल
"विरोधकांचे सर्व धंदे उद्यानंतर बंद होतील"; संजय राऊतांचा इशारा

सोलापूर : असंघटित कामगारांनी ई-श्रमद्वारे नोंदणी केल्यास 18-40 वर्षे वयोगटातील व्यक्‍तींना, ज्यांचे मासिक उत्पन्न 15 हजारांपेक्षा कमी आहे, त्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन पेन्शन योजनेअंतर्गत दरमहा तीन हजारांचे निवृत्ती वेतन मिळते. रस्त्यावरील विक्रेते, शेतमजूर, बांधकाम क्षेत्रातील कामगार, चामड्याच्या उद्योगातील कामगार, हातमाग, मध्यान्ह भोजन कामगार, रिक्षाचालक किंवा ऑटोचालक, चिंध्या वेचणारे, सुतार, मच्छीमार अशा असंघटित कामगार या योजनेचे लाभार्थी आहेत.

ई-श्रम पोर्टल
रात्रीत 'करोडपती' झाले क्रिकेटर; गावसकरांना का खुपलं?

केंद्र सरकारने सर्वसामान्य, हातावरील पोट असलेल्यांसह असंघटित कामगारांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. त्या योजनांच्या लाभासाठी 'ई-श्रम'द्वारे लाभार्थींना नोंदणी करावी लागते. काही योजनांचा लाभ बॅंकांच्या माध्यमातून दिला जातो. बॅंकेतील बचत अथवा जनधन खात्यातून योजनेचा हप्ता कपात केला जातो. आतापर्यंत देशभरातील 25 कोटी 58 लाख 22 हजार 246 जणांनी विविध योजनांमध्ये नोंदणी करून केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या eshram.gov.in द्वारे नोंदणी करून श्रमकार्ड घेतले आहे. वृध्दपकाळ आरामदायी जावा, उदरनिर्वाहासाठी ज्येष्ठांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी पेन्शन तथा निवृत्ती वेतन योजना सुरु केल्या आहेत. तर हातावरील पोट असलेल्या दोनवेळच्या जेवणासाठी धडपडणाऱ्यांना आजारपणात मोफत उपचार मिळावेत, त्यासाठी योजना आहेत. असंघटित कामगारांसह विविध घटकांचा त्यात योजनांमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी ऑनलाइन केंद्रांवर अथवा आपले सरकार सेवा केंद्रांवरुन अर्ज करावा लागतो. त्यासाठी आधारकार्ड, बॅंक खाते क्रमांक आणि मोबाइल क्रमांक लागतो.

ई-श्रम पोर्टल
शाळेतील पटसंख्या वाढीसाठी 'मुले शिकवा'ची विशेष मोहीम

तुम्ही या योजनांचे लाभार्थी आहात का?
1) दुकानदार, व्यापारी, स्वयंरोजगार असलेल्या व्यक्‍तींसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना : योजनेअंतर्गत लाभार्थींना वयाच्या 60 वर्षांनंतर तीन हजारांची मासिक विमा निवृत्ती वेतन मिळते. दुकानदार तथा मालक, छोटी दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल्स, रिअल इस्टेट ब्रोकर ज्यांचे वय 18 ते 40 आहे आणि ज्यांची वार्षिक उलाढाल दीड कोटींपेक्षा अधिक नाही, त्यांना लाभ मिळतो. लाभार्थींच्या वयानुसार मासिक हप्ता 55 ते 200 रुपयांपर्यंत असतो.
2) प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना : कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास दोन लाखांचा विमा मिळतो. 18 ते 50 वयोगटातील व्यक्‍तींना योजनेचा लाभ दिला जातो. त्यासाठी बॅंकेतील खात्यातून काही रक्‍कम कपात होते.
3) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना : अपघाती मृत्यू अथवा पूर्ण अपंगत्वासाठी दोन लाख आणि अंशिक अपंगत्वासाठी एक लाख रुपयांचा विमा मिळतो. बॅंकेतील जनधन अथवा बचत खात्यावरून 18 ते 70 वयोगटातील व्यक्‍तींसाठी ही योजना लाभदायी आहे. त्यांच्याकडून काही ठरावीक रक्‍कम कपात केली जाते.
4) अटल पेन्शन योजना : योजनेअंतर्गत संबंधिताला एक ते पाच हजारांपर्यंत पेन्शन मिळू शकते. त्याच्या मृत्यूनंतर पेन्शनची एकूण रक्‍कम वारसाला दिली जाते. जमा झालेली रक्‍कम जोडीदाराला तथा त्याच्या वारसदाराला दिली जाते. 18 ते 40 वयोगटातील तरुणांनी बॅंकेत खाते उघडून ते खाते आधारकार्डशी लिंक करावे. दरमहा त्याचा हप्ता भरल्यास वयाच्या 60 वर्षानंतर या योजनेचा लाभ मिळतो.
5) राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम-वृध्दावस्था संरक्षण : या योजनेअंतर्गत विविध वयोगटांसाठी तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत केंद्रीय योगदान दिले जाते. राज्य सरकारच्या योगदानानुसार मासिक पेन्शन एक ते तीन हजारांपर्यंत मिळते. उदरनिर्वाहासाठी कोणतेही साधन नसलेल्या निराधारांना हा लाभ मिळतो.
6) आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना : या योजनेअंतर्गत लाभार्थीला पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतात. 16-59 वयोगटातील सदस्य, कच्च्या भिंती, छप्पर असलेल्या एका खोलीतील कुटुंब, निरोगी प्रौढ सदस्य नसलेले, सफाई कामगार कुटुंब, भूमिहीन कुटुंब, कौटुंबिक उत्पन्नाचा मोठा भाग अंगमेहनतीतून कमावतात, अशांना या योजनेचा लाभ मिळतो.
7) हाताने सफाई कामगारांच्या पुनर्वसनासाठी स्वयंरोजगार योजना : योजनेअंतर्गत नॅशनल सफाई कर्मचारी फायनान्स ऍण्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे आयोजित केलेल्या प्रशिक्षणांच्या यादीतून मॅन्युअल सफाई कामगार व त्यावर अवलंबून असलेल्यांना विनामूल्य त्यांच्या आवडीचे कौशल्य प्रशिक्षण मिळेल. त्यासाठी मासिक स्टायपेंड तीन हजार रुपये मिळतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com