
सोलापूर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन शुक्रवार (ता. २९) ते २ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सहकार्याने याचे आयोजन करण्यात आले आहे.