formr mla deepak aaba salunkhe patil and radhakrishna vikhe patil
sakal
सांगोला - राज्यात सर्वत्र मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असताना दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यात मात्र अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे कृष्णा, कोयना, भीमा, पंचगंगा व नीरा नदीतून पुराच्या रूपाने वाहून जाणारे अतिरिक्त पाणी टेंभू उपसा सिंचन योजना, म्हैसाळ उपसा सिंचन योजना तसेच नीरा उजवा कालव्यातून सांगोला तालुक्यात तातडीने सोडावे, अशी मागणी माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.