चोखोबाच्या 684 व्या स्मृतीदिन सोहळ्याच्या निमित्ताने भजन स्पर्धेसह धार्मिक कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sant chokhoba 684th Memorial celebrations

चोखोबाच्या 684 व्या स्मृतीदिन सोहळ्याच्या निमित्ताने भजन स्पर्धेसह धार्मिक कार्यक्रम

मंगळवेढा : श्री संत शिरोमणी चोकोबाराय यांच्या 684 व्या स्मृतीदिन सोहळ्याच्या निमित्ताने राज्यस्तरीय भजन स्पर्धेसह 17 ते 20 मे दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती चोखोबा समाधी ट्रस्टचे अध्यक्ष जयराज शेंबडे यांनी दिली. श्री संत चोखामेळा समाधी मंदिर व वारी परिवार यांच्या पुढाकाराने दि 17 मे रोजी स.9 वा. श्री संत दामाजी महाराज मंदिरा पासून ते चोखोबाराॅय यांच्या समाधी पर्यंत ग्रंथ पालखीसह दिंडी पालखी प्रदक्षिणा होऊन स.10 वाजता ह.भ.प.रत्नाकर महाराज तनाळी यांचे शिष्य ह.भ.प स्व. कृष्णा रघुनाथ शेंबडे यांच्या शुभ आशीर्वादाने या सोहळ्याची सुरुवात वीणा पूजन व स्मरणिका प्रकाशनाने होणार आहे.हा सोहळा ह.भ.प माधव महाराज नामदास यांच्या शुभहस्ते होणार आहे.

सकाळी 11 ते 5 राज्यस्तरीय भव्य संगीतसमूह भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तर रात्री 7 वाजता ह. भ.प.मधुकर महाराज गिरी यांचे कीर्तन होणार आहे. बुधवार 18 मे रोजी स.9 ते 5 भजन स्पर्धेचे दुसरा दिवस होणार आहे.संध्या 7 वा. सामाजिक प्रबोधन प्रबोधनात्मक जुगलबंदी भारुड संदीप मोहिते (तिप्पेहळ्ळी ता.सांगोला) व अण्णा महाराज (वायफळ ता. जत) गुरुवार 19 मे रोजी 9 ते 4 सामुदायिक भजन,सायं.5 वा. राज्यस्तरीय स्पर्धेचे पारितोषिक वितरण व संध्या.7 सात वा. माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांचे संत शिरोमणी चोखोबाराय या विषयावर प्रवचन होणार आहे.20 मे रोजी स. 9 वा. श्री संत शिरोमणी चोकोबाराय यांच्या समाधीस महाभिषेक सोहळा,स.11 वा. शिरोमणी नामदेव महाराज यांचे 16 वशंज हभप निवृत्ती माधव नामदास पंढरपूर यांचे किर्तनानंतर समाधीवर पुष्पवृष्टी होणार आहे दुपारी एक वाजता महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे

Web Title: Religious Program Bhajan Sant Chokhoba 684th Memorial Celebrations Solapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top